अवैध वसुली प्रकरणी आरटीओ निरीक्षकासह दलाल एसीबीच्या जाळ्यात..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 9, 2023

अवैध वसुली प्रकरणी आरटीओ निरीक्षकासह दलाल एसीबीच्या जाळ्यात..!

अवैध वसुली प्रकरणी आरटीओ निरीक्षकासह दलाल एसीबीच्या जाळ्यात..!                                                                       नागपूर:-जनता परेशान असताना भर रस्त्यात व घाईच्या कामासाठी जात असेल अथवा एखाद्या बिकट प्रसंग असेल अश्या वेळी हमखास चेकपोस्ट च्या नावाखाली वाहनांची अडवणूक करून सेटलमेंट केली जात असल्याचे अनेक प्रवाशांनी बोलताना व्यक्त केल्या,तर जिथे ओव्हर लोड, प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी ,वाळू, मुरूम,खडी असे वाहनांवर कारवाई होत नाही कारण यांच्याकडून 'कार्ड' चालू असल्याचे वाहन चालक सांगताना दिसते.आरटीओ आणि
भ्रष्टाचार, हे एक समीकरणच बनले आहे. परवाना मिळवण्यापासून प्रत्येक कामांसाठी या विभागात दलाल सक्रिय आहेत. चेक पोस्टवरसुद्धा दलालांचाच वावर अधिक असतो. नागपूर जिल्ह्यात चेक पोस्टवर अवैध वसुली करताना दोन दलालांसह आरटीओच्या निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले आहे.
८ फेब्रुवारीच्या रात्री झालेल्या या कारवाईने आरटीओ विभागात खळबळ उडाली आहे. आरटीओ निरीक्षक अभिजित सुधीर मांढरे (वय ३९), करण मधुकर काकडे (वय २८, रा. रामटेक) आणि विनोद महादेवराव लांजेवार (वय ४८, रा. कामगार कॉलनी,सुभाषनगर) यांचा समावेश आहे. मांढरे ग्रामीण आरटीओमध्ये कार्यरत असून, त्यांची पोस्टिंग कांद्री
चेकपोस्टवर होती. ३३ वर्षीय ट्रकचालक बुधवारी
मनमाडहून रेवाकडे जात होता. मांजरे यांच्या दोन
दलालांनी त्यांचे वाहन कांद्री पोस्टवर अडवले. त्याच्यावर जबरदस्तीने चालान कारवाई केली आणि ५०० रुपयांची एन्ट्रीही मागितली. चलन असूनही पैसे मागितल्याने ट्रकचालकाने नकार दिला. दोन्ही दलालांनी मांजरे यांच्या उपस्थितीत ट्रकचालकाला शिवीगाळ करून वाहन जप्त करण्याची धमकी दिली.जबरदस्तीने ५०० रुपये देऊन पुढे निघून गेला. काही अंतर गेल्यावर त्यांच्या गाडीचा ब्रेक लागला. मालकाने
गाडी नागपूरला नेण्यास सांगितले. ट्रकचालक पुन्हा नागपूरच्या दिशेने वळला.त्यानंतर पुन्हा त्यांचे वाहन थांबवून प्रवेशासाठी ५०० रुपये मागितले. ट्रक चालकाने त्याच्या साहेबांना
माहिती दिली. मालकाने एसीबीकडे तक्रार करण्यास सांगितले. ट्रकचालकाने या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे केली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला.मांढरे यांच्या उपस्थितीत दलालांना ५०० रुपये घेताना पकडण्यात आले. मांढरे यांच्या पत्नी गीता शेजवळ नागपूर आरटीओमध्ये
इन्स्पेक्टर आहेत. दोघेही चांगलेच चर्चेत
आहेत. मांढरे आणि शेजवळ यांच्या मालमत्तेची
चौकशी सुरू असल्याचा दावा एसीबीच्या
सूत्रांनी केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी वेगवेगळ्या शहरात अनेक एकर जमीन खरेदी केली.गीता शेजवळ यांनी उस्मानाबाद  येथे कार्यरत असताना पात्रता प्रमाणपत्रात घोटाळा केला होता. त्यात पोलिसांनी गीता आणि शाळा व्यवस्थापनाविरुद्ध फसवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
विभागीय चौकशीत गीता दोषी आढळल्याने त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली होती. आरटीओच्या सूत्रांनुसार, मांढरे यांच्यासह त्यांची पत्नी गीता यांचा भाऊ मनोज शेजवळ यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच नागपूर  ग्रामीण
आरटीओच्या विविध चेकपोस्टवर ट्रकचालक व मालकांना धमकावून वसुली केल्याच्या आरोपाची अनेक प्रकरणे समोर आली. मात्र, असे
असतानाही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment