बारामती:- बारामती शहरामध्ये ९ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन गर्जना मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेग वेगळ्या जिल्ह्यांमध्ये हिंदू मोर्चाचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने केले आहे. त्याच धर्तीवर बारामतीतील हिंदू समाजाने मोर्चाचे आयोजन केले आहे. गेल्या महिन्यामध्ये ह भ प कोकाटे महाराज यांनी बारामती तील प्रमुखांची हिंदू जन गर्जना मोर्चा संदर्भात बैठक घेतली होती त्यावेळी त्यांनी मोर्चाला येण्याचे आवाहन केले होते. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कसबा येथून होणार आहे त्यानंतर गुनवडी चौक, मारवाड पेठ, गांधी चौक, भिगवन चौक, आणि तीन हत्ती चौक येथे मार्गदर्शन सभा होणार आहे. या सभेला प्रखर हिंदू प्रवक्ते कालीचरण महाराज, शरद गायकर, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मागण्या- लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा. तसेच धर्मांतरविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच गोहत्याबंदी कायदा करून कडक अंमलबजावणी करावी. व सर्व मंदिरांना पर्यटनाचा दर्जा देऊ नये त्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा. अशा प्रमुख मागण्यांसाठी हिंदू जन गर्जना मोर्चाचे आयोजन केले आहे.
No comments:
Post a Comment