सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी दिनांक ०९ व १० फेब्रुवारी रोजी पोस्ट ऑफिस मार्फत विशेष मोहिमे चे आयोजन..
पुणे:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 9 व 10 फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतामध्ये 7.5 लाख सुकन्या समृद्धी अकाउंट सुरू सुरू करण्याची विशेष मोहीम पोस्ट ऑफिस मार्फत राबवली जाणार आहे असे श्री बी पी एरंडे, अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण विभाग यांनी सांगितले.सुकन्या समृद्धी योजनेची ठळक वैशिष्टे खालील प्रमाणे आहेत,
• दहा वर्षा पेक्षा कमी वय असणाऱ्या एका कुटुंबातील दोन मुलींची नावे खाते
उघडता येते.
•कमीत कमी रुपये 250 व जास्तीत जास्त 1.5 लाख रकमेचे एका आर्थिक
वर्षात गुंतवणूक करता येते.
•मुदत 21 वर्ष असली तरी भरणा मात्र खाते उघडल्यापासून पंधरा वर्षे
करायचा आहे.मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी 50% रक्कम काढता येते.गुंतवलेल्या रकमेवर आयकर कलम ८० सी अंतर्गत सूट.
• इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे ऑनलाईन पैसे भरण्याची सोय.
●• व्याजदर ७.६% ( प्रचलित)
• प्रचलित व्याज दरानुसार प्रती महिना रुपये १००० जमा केल्यास १५ वर्षान मध्ये १,८०,००० जमा होऊन, २१ वर्षा नंतर अंदाजे रक्कम रुपये
५,१०,३७७/- मिळते.सुकन्या योजनेचे सर्व पालकांनी दिनांक ०९ व १० फेब्रुवारी रोजी
नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपल्या मुलींचे खाते खोलावे व त्यांचे भविष्य सुरक्षित करावे असे आवाहन श्री एरंडे यांनी केले.
No comments:
Post a Comment