अ.ब.ब..७४ वर्षाच्या महिलेने आपल्या ७८ वर्षाच्या पतीविरुद्ध दिली तक्रार.. पुणे :- ऐकावं ते नवलच आहे, तब्बल सत्तरी ओलांडले वयोवृद्ध नवरा बायको पटत नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून ते वेगळे राहू लागले. या दरम्यान,पतीने आपली बनावट सही करुन फसवणूक केल्याची ७४ वर्षाच्या महिलेने
आपल्या ७८ वर्षाच्या पतीविरुद्ध तक्रार दिली आहे.याबाबत पाषाण येथील पंचवटीमध्ये राहणाऱ्या एका ७४ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि.
नं. ४३ / २३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी
शिवाजीनगर येथील एका बंगल्याच्या आऊट
हाऊसमध्ये राहणाऱ्या ७८ वर्षाच्या ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीचा हा प्रकार १२ फेब्रुवारी २०२३ पूर्वी घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी
आणि आरोपी हे दोघे पती पत्नी आहेत.
फिर्यादी व त्यांचा मुलगा हे सध्या एकत्र राहत आहेत.तर गेल्या काही महिन्यांपासून फिर्यादीचा पती एका बंगल्यातील आऊट हाऊसमध्ये रहात आहे. जंगली महाराज रोडवरील एका इमारतीतील एक दुकान फिर्यादी व तिचे पती त्यांच्या नावावर आहे. फिर्यादी व त्यांचा मुलगा आपले काही ऐकत नाही, या कारणावरुन त्यांच्या पतीने दुकानातील दोन प्लॉटर,चार संगणक व इतर वस्तू पार्किंगमध्ये काढून ठेवल्या.फिर्यादीची १० हजार रुपयांची रक्कम चोरली.फिर्यादीचे दुकानाचा फेअर अँड फास्ट नावाचा बोर्ड
काढून टाकला. तसेच फिर्यादीची बनावट सही करुन आर्टिकल ऑफ अॅग्रीमेंटवरील फिर्यादीचे नाव खोडून फिर्यादीची फसवणूक केली
असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक नाईक तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment