खळबळजनक..शासकीय अधिकारी तरुणीवर अत्याचार करत अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले १६ लाख ८६ हजार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 28, 2023

खळबळजनक..शासकीय अधिकारी तरुणीवर अत्याचार करत अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले १६ लाख ८६ हजार...

खळबळजनक..शासकीय अधिकारी तरुणीवर अत्याचार करत अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले १६ लाख ८६ हजार...
पुणे :- सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिला विजय लॉजवर नेले.तेथे तिच्यावर बलात्कार केला  असल्याची धक्कादायक बातमी आली याबाबत मिळालेली माहिती अशी की, बस प्रवासात ओळखीतून त्याने पुस्तक खरेदी करण्यासाठी पुण्यात आलेल्या तरुणीला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तिचे विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तब्बल १६ लाख ८६ हजार रुपये उकळले. या तरुणाला शिवाजीनगर
पोलिसांनी अटक केली आहे.फहीम नईम सय्यद (वय ३३, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २७
वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात
 फिर्याद (गु.रजि. नं. ५५/२३) दिली आहे. हा प्रकार बालगंधर्व रंगमंदिरसमोरील विजय लॉज येथे २ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार ते ३ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत तसेच ५ नोव्हेंबर २०२२ ते १९ जानेवारी २०२३ दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही सांगली येथे रहात असून पुण्यात येत असताना तिची फहीम सय्यद याच्याशी बसमध्ये ओळख झाली. त्याने आपली ट्रॅव्हल एजन्सी असल्याचे सांगितले. त्यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले.
त्यावरुन त्यांच्यात संभाषण होऊ लागले. २ नोव्हेबरला ती पुण्यात येत असताना त्याने फोन केला. त्यांनी पुस्तकांची खरेदी केली. त्यानंतर त्याने जेवण करु असे सांगून बालगंधर्व चौकातील हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिला विजय लॉजवर नेले.तेथे तिच्यावर बलात्कार केला. तिचे विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ काढले.
 त्यानंतर दोन दिवसांनी त्याने हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याबदल्यात त्याने पैशांची मागणी करण्यास सुरुवात
केली.आपली बदनामी होऊ नये, म्हणून या तरुणी कर्ज काढून त्याला महिन्याभरात १६ लाख ८६ हजार रुपये दिले.तरीही त्यांची मागणी थांबत नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे.पोलिसांनी फहीम सय्यद याला अटक केली. सय्यद याची ट्रॅव्हल एजन्सी नसून तो एका एजन्सीत चालक म्हणून काम करीत असल्याचे उघड झाले. सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment