*शिधापत्रिकाधारकांना फेब्रुवारीच्या धान्यासोबत जानेवारीच्या धान्याचे वितरण*
पुणे दि. २१: सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरीत करावयाचे जानेवारी २०२३ चे धान्य मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांना जानेवारीचे धान्य फेब्रुवारी २०२३ च्या धान्यासह स्वस्तधान्य दुकानामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पिवळे कार्डधारकांना प्रति कार्ड ३५ किलो, केशरी कार्डधारकांना प्रति लाभार्थी ५किलो मोफत धान्य वाटपासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment