वसंतनगर बाग ते वसंतनगर रोड झाला निकृष्ठ दर्जाचा; बांधकाम विभाग अधिकारी घेतंय झोपीचं सोंग.! बारामती(संतोष जाधव):- बारामती विकासाच्या वाटचालीकडे चाललंय असं म्हणतात मग ज्या रस्त्यावरून सतत रहदारी असणारा वसंतनगर रस्ता ज्या रस्त्यावरून कॉलेज, हायस्कूल, शाळा व लोकवस्ती असणारा भाग या रस्त्यावर जाणारा येणारा नागरिक, विद्यार्थी यांना या खडतर रस्त्याचा वापर होत असताना सामना करावा लागत आहे, या रस्तावर कुठे डांबर कमी तर कुठे खडी चे डिगारे चालताना अनेक वेळा अपघात झाले तात्पुरता कच्चा रस्ता करून नेमकं काय साधलं हे कळेना झालंय, वारंवार पाठपुरावा करून याचा उपयोग होत नाही मात्र निकृष्ठ दर्जा देण्यात माहीर असलेले ठेकेदार व अधिकारी यांचं साठलोट आहे की काय हा सवाल विचारला जात आहे, नेमका हा रस्ता कधी होणार की नगरपालिका निवडणूका तोंडावर आल्या की तात्पुरती रस्त्याची कामे करायची आणि पुन्हा खड्डेमय रस्त्यातून नागरिक ये जा करीत राहणार भिगवण रोड ची चाललेली झपाट्याने कामे पाहता या कामाकडे दुर्लक्ष होत आहे की निधी कमी पडत आहे हे समजत नसल्याने या रस्त्याचे काम तात्काळ न झाल्यास लोकवर्गणीतून या रस्त्यावर डांबरीकरण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी सांगितले, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा ज्या भागात दौरा करणार आहे त्याभागात रात्रीत रस्ता होतो असे ऐकलंय जर खरंच असं असेल तर दादा आपण आमच्या वसंतनगर भागातून एखादा दौरा करावा म्हणजे हा रस्ता तात्काळ होईल व ये जा करणारे जेष्ठ वयोवृद्ध,नागरिक, विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.
Post Top Ad
Tuesday, February 21, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
वसंतनगर बाग ते वसंतनगर रोड झाला निकृष्ठ दर्जाचा; बांधकाम विभाग अधिकारी घेतंय झोपीचं सोंग..!
वसंतनगर बाग ते वसंतनगर रोड झाला निकृष्ठ दर्जाचा; बांधकाम विभाग अधिकारी घेतंय झोपीचं सोंग..!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment