खळबळजनक..तीनदा झाला मतिमंद मुलीवर बारामती तालुक्यात बलात्कार..
बारामती :-मुली व महिला सुरक्षित नसल्याचे व त्यातच मतिमंद मुलीवर सुद्धा अत्याचार झाल्याचे पुढे आले याबाबत मिळालेली माहिती अशी की,बारामती तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिवराज पोपट खरात (रा.कांबळेश्वर, ता. बारामती) याला माळेगाव पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पिडीत युवतीच्या आईने
पोलिसांत फिर्याद दाखल केली. मागील पाच
महिन्यापूर्वी ही घटना कांबळेश्वर गावच्या हद्दीत खरात याच्या घरात घडली.फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पिडीतेने आपल्या आईकडे
पोटात दुखत असल्याची तक्रार केली. त्यावर कुटुंबियांनी तिला बारामतीतील महिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता ती १९ आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.आईने मुलीला विश्वासात घेवून या प्रकरणी अधिक
विचारपूस केली असता तिने घराशेजारी राहणाऱ्या खरात याने ती खेळत असताना तिच्या हाताला धरून घरामध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध तीनदा शारीरिक संबंध केल्याचे सांगितले. त्यानुसार आईने संशयिताविरोधात
फिर्याद दाखल केली असल्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले,असून अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment