बारामती च्या माजी नगरसेवकाची व पत्रकाराची खंडणीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 15, 2023

बारामती च्या माजी नगरसेवकाची व पत्रकाराची खंडणीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता..

बारामती च्या माजी नगरसेवकाची व पत्रकाराची खंडणीच्या गुन्ह्यातून  निर्दोष मुक्तता..

बारामती:-बारामती येथील प्रथमवर्ग न्यायाधीश श्रीमती मा एन व्ही रणवीर सो  यांनी माजी नगरसेवक भाजप नेते व साप्ताहिक सेक्युलर रायटर चे संपादक असिफ खान यांची खंडणी व जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करण्याच्या आरोपातुन पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली,मिळालेल्या माहितीनुसार
सविस्तर वृत्त असे की, बारामती शहर पोलीस स्टेशन येथे तत्कालीन  अधिकारी यांनी असिफ खान यांचे विरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता, त्यामध्ये असा आरोप  ठेवण्यात आला होता की फिर्यादी हा सरकारी नोकरदार आहे फिर्यादीच्या मुलीने एका तरुणासोबत विवाह केला ही बाब आरोपीने त्याचे  साप्ताहिक सेक्युलर रायटर मध्ये छापण्याची धमकी  देऊन
दि 12/07/2010  ते दिनांक 13/09/2010 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत आरोपीने फिर्यादीस वेठीस धरून ब्लॅकमेल करून शिवीगाळ करून  व जीवे मारण्याची धमकी देऊन रक्कम रुपये 50 हजार ची खंडणी मागितली व खंडणी न दिल्यास पेपर मध्ये बदनामी करू अशी धमकी दिली अशाप्रकारचा आरोप  ठेवण्यात आले होते,
सदर गुन्ह्यात आरोपीस उच्च न्यायालय मुंबई येथे अटकपूर्व जमीन मंजूर झाला गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र मे कोर्टात दाखल झाले, सरकारी पक्षाच्या वतीने चार साक्षिदार तपासण्यात आले आरोपीच्या वतीने  ॲड विनोद जावळे यांनी कामकाज पाहिले,प्रस्तुत खटल्यात स्वतंत्र साक्षीदार निष्पन्न होत नाहीत ,फिर्यादीच्या भ्रष्टाचार संदर्भात आरोपीने साप्ताहिक मध्ये वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या, फिर्यादीची मुलगी व तिचा नवरा यांना विवाह  करण्यासाठी आरोपी ने मदत केली होती याचा राग मनात धरून फिर्यादीने खोटी फिर्याद दाखल केली अशा प्रकारचा युक्तिवाद मे कोर्ट समोर करण्यात आला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरतमे कोर्टाने आरोपी विरुद्ध समोर पुरावा निष्पन्न होत नसल्याने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली,आरोपीच्या वतीने ॲड विनोद जावळे,ॲड प्रणिता जावळे,ॲड राहुल शिंदे,ॲड विशाल मापटे, मानसी गायकवाड यांनी कामकाज पाहिजे.

No comments:

Post a Comment