*चालू मोटार सायकलवर सुर्य नमस्कार करणारा बारामतीचा रोहित शिंदे यांची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद!* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 10, 2023

*चालू मोटार सायकलवर सुर्य नमस्कार करणारा बारामतीचा रोहित शिंदे यांची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद!*

*चालू मोटार सायकलवर सुर्य नमस्कार करणारा बारामतीचा रोहित शिंदे यांची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद!*
बारामती(प्रतिनिधी):- 14 जानेवारी जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त चालू मोटारसायकलवर 4 मी. 20 सेकंदा मध्ये सुर्यनमस्कार घातले म्हणून रोहित दिलीप शिंदे यांची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे.  मोटार सायकलवर 10 वेळा सुर्यनमस्कार काढणारा जगातील पहिला मोटार सायकल रायडर आहे. तो वयाच्या 16 वर्षापासून मोटार सायकल रेस करीत आलेला आहे.
गेल्या 12 वर्षापासून मोटार सायकल रायडींग करून आतापर्यंत 300 हून अधिक मोटार सायकल रायडिंग शो भारतात केले आहे. मोटार सायकल रायडींग करणे हा स्वत:पुरता मर्यादीत राहिलेला नसून त्याने अनेक इच्छुक युवकांना मोटार सायकल रायडींगचे प्रशिक्षण देण्यास सुरू केले आहे.
मोटार सायकल स्टंटमध्ये मोटोक्रॉस, स्टंट रायडींग ऑफ रोडींग, ऍटोक्रॉस आणि रॅलीमध्ये उत्तुंग कामगिरी केली आहे. 
नुकत्याच झालेल्या झारखंडमधील रांची येथे मोटार सायकल रायडींगमध्ये प्रथम क्रमांक मिळवून नावलौकीक केलेला आहे. त्यामध्ये देशातील 70 रायडर ने भाग घेतला होता. केटीएम कंपनीच्या आरसी390 सीसी गाडीवर रेस जिंकून चेन्नई येथे होणार्‍या ट्रॅक रेसिंग नॅशनल स्पर्धेसाठी रोहितची निवड झालेली आहे. यामध्ये प्रथम दहामध्ये येणार्‍यास ऑस्ट्रिया केटीएम ग्लोबल हेडक्वॉटर स्पर्धेत भाग घेता येणार आहे असे बजाज ऍटो लि.,चे अध्यक्ष सुमित नारंग यांनी सांगितले. 
सन 2018 मध्ये मोटार सायकल रायडींगमध्ये रोहित महाराष्ट्रात पहिला व केरळमध्ये देशात तिसरा आला होता तर  सन 2019 मध्ये हैद्राबाद मध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता.
यापूर्वी तामिळनाडू कोईमतूर मध्ये झालेल्या मोटार सायकल रायडींगमध्ये वेगवेगळ्या तीन स्पर्धेमध्ये रेकॉर्ड करून बारामतीतील रोहित दिलीप शिंदे यांनी देशात पहिला क्रमांक मिळविला होता. सीआरएफ कंपनीने स्टंट वॉलफेअर राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये फ्री स्टाईल स्टंट रायडींग ऑबस्टूकल टाइम चॅलेंज व लास्ट मॅन स्टँडींग या तिन्ही स्पर्धामध्ये रोहितने अव्वलस्थान पटकाविले होते. मोटारसायकल एका चाकावर उचलून जास्तीत जास्त गाडी गोल फिरविण्याची स्पर्धा होती. केवळ 8 मी. 28 सेकंड एवढ्या कालावधीत तिन्ही स्पर्धेत रेकॉर्ड केले होते. तिन्ही स्पर्धेत एकत्रित रेकॉर्ड करणारा रोहित शिंदे हा स्टंट रायडिंगमध्ये पहिला खेळाडू ठरला आहे. 

*सोबत : इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेले प्रमाणपत्र घेतलेला रोहित दिलीप शिंदे*

No comments:

Post a Comment