धक्कादायक..बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी सह राजकीय नेत्याच्या मुलाला गोळ्या घालण्याची धमकी; मागितली 30 लाखांची खंडणी..
पुणे :- मोबाईल वर बनावट लग्नाचे सर्टिफिकेट पाठवत खंडणी मागणीचा मेसेज करत बलात्कारची केस करेल अशी धमकी प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, बनावट मॅरेज
सर्टिफिकेट तयार करुन ३० लाख रुपयांची खंडणीची मागणी एका राजकीय नेत्याच्या मुलाकडे केली.पैसे दिले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणाने भारती विद्यापीठ
पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १५५/२३) दिली आहे.हा प्रकार ७ फेब्रुवारीपासून सुरु होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी यांच्या व्हॉटसअॅपवर ७ फेब्रुवारी रोजी एका मोबाईलवरुन एका मुस्लिम मुलीसोबत विवाह झाल्याबाबतचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ता. सोयगावमधील वडगाव (ती) चे ग्रामसेवकाचे बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाठविले. "हमने आप के नाम का मॅरेज
सर्टिफिकेट बनाया है, खराडी इऑन आय टी पार्क के सामने इनोव्हा मे २० लाख रुपये रख देना. आपने नही दिया तो आपपर रेप केस कर दुंगी" असा धमकीचा मेसेज आला. त्याकडे फिर्यादीने दुर्लक्ष केले. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी त्यांना या तरुणीच्या नावाने मेसेज आला. “तूने ३० लाख रुपये नही दिए तो तुझे रेप के केस मे अंदर कर दुंगी खराडी इऑन आय टी पार्क के सामने डर्क लाईन प्लॉट के अंदर इनोव्हा मे ३० लाख रुपये रख देना. पैसे नही रखे तो मॅरेज सर्टिफिकेट व्हायरल कर दुंगी,असा धमकीचा मेसेज आला. त्यानंतर ५ मार्च रोजी
व्हॉटसअॅप वर "दे रहा क्या पैसा नही तो मार दुंगी,तेरी पुरी सेटिंग हुई है बहुत जल्द मार देंगे तेरे को गोली मार के जायेंगे तेरे बाप को बोल देंगे तेरे को बचाने के लिए, “असा मेसेज करुन ३० लाख रुपये देण्याची धमकी दिली. गोळी मारण्याची धमकी दिल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक पुराणिक तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment