विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखा - देविदास साळवे
सोमेश्वरनगर(प्रतिनिधी):- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत प्रचंड क्षमता असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखून आपले आवडते क्षेत्र निवडावे. बोर्डाच्या परीक्षेचा तणाव न घेता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा असा विश्वास माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे यांनी व्यक्त केला.
अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलिस उपनिरीक्षक देविदास साळवे उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अभ्यास करताना वेळेचा योग्य वापर करा. पुरेशी झोप घ्या. काळजीपूर्वक पेपर लिहा. मात्र चुकून अपयश आली तर अपयशाने खचून जाऊ नका. अनेक मार्ग असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नका. मात्र दहावी नंतर तुमच्या हातात मोबाईल येणार आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा जपून वापर करा. गैरवापर केल्यास एक चूक खूप महागात पडते असे त्यांनी सांगितले.
यावेळी सामजिक कार्यकर्ते मच्छिंद्र टिंगरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष बी एस परकाळे यांनी ही विद्यार्थांना परीक्षा व जीवनातील पुढील संधी यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी साक्षी परकाळे, प्रांजल ढोबळे, अपेक्षा चितारे, सुनीता सोरटे यांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जमदाडे यांनी केले तर आभार संध्याश्री अलगुंडेवार यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment