धक्कादायक..दुसऱ्या महिलेवर केला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार,पहिले लग्न झाल्याचे लपवल्याने केला गुन्हा दाखल..
सातारा :- महाराष्ट्र राज्यात गुन्हेगारी बरोबर महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे कळतंय अशीच एक घटना घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की,पहिले लग्न झाले असतानाही ते लपवून
दुसऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून एकाने
तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना
साताऱ्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी
माळशीरसमधील एकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.कैलास हरिदास होनमाने (रा. वाघोली, ता. माळशिरस,जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला साताऱ्यातील राहणारी असून, ती २६वर्षांची
आहे. कैलास होनमाने याच्याशी २०१३ मध्ये तिची ओळख झाली. त्यावेळी कैलासने त्या महिलेला 'मी तुझ्याशी लग्न करीन, असे आमिष दाखविले. त्यानंतर सातारा शहरात विविध ठिकाणी तसेच अकलूज येथील लॉजवर नेऊन पीडितेवर त्याने बलात्कार केला.काही दिवसांनंतर पीडितेला कैलास होनमाने याचे
पहिले लग्न झाले असल्याचे समजले. त्यावेळी पीडित महिलेने त्याला 'लग्न कधी करणार,' असे विचारले असता त्याने 'मी तुझ्याशी लग्न करणार नाही. जर तू कोणाला काही सांगितलेस तर मी तुझे विवस्त्र फोटो काढले आहेत. ते व्हायरल करेन. तसेच तुझ्या मुलीचं काय करायचे ते मी बघतो,' अशी दमदाटी केली.या प्रकारानंतर संबंधित पीडित महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.अद्यापर्यंत पोलिसांनी होनमानेला अटक केली नव्हती.
त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक सोलापूरला रवाना झाले आहे.
No comments:
Post a Comment