धक्कादायक..अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत घेतले ५ हजार;प्रकरण होतं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचं.
पिंपरी :-पैसे दिले नाहीतर मुलीचे अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केले.तसेच तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या आईकडून पाच हजार रुपये ऑनलाइन
घेतले. त्यानंतर मुलीच्या आईला फोटो पाठवले.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
रोशन कैलास चव्हाण (वय २५, रा. माणगाव, मुळशी)याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १५) फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादीची १५ वर्षीय मुलगी या दोघांचे प्रेमसंबंध असून, आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये मुलीचे अश्लील फोटो काढले. आरोपीने फिर्यादी महिलेकडे पैशांची मागणी केली. पैसे नाही दिले तर फिर्यादीचे मुलीचे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी महिलेकडून पाच हजार रुपये ऑनलाइन घेतले. फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केले. आरोपीचे स्वत:चे फिर्यादीच्या मुलीसोबतचे अश्लील फोटो फिर्यादी महिलेला पाठविले, असे फिर्यादीत नमूद केले असून पोलीस तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment