बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे वतीने हमीदराने हरभरा खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 2, 2023

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे वतीने हमीदराने हरभरा खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू


बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे वतीने हमीदराने हरभरा  खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू 

बारामती:- हंगाम २०२२-२०२३ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडच्या वतीने चना (हरभरा) खरेदी करणेत येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया  दि. ०१/०३/२०२३  ते १५/०३/२०२३  या कालावधीत सुरू राहणार आहे. सदर चना( हरभरा) प्रति क्विंटल रू. ५३३५/- या हमीभावाने खरेदी होणार आहे. तरी हरभरा उत्पादक  शेतक-यांनी आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन नोंदणी करावी असे आव्हान बाजार समितीचे प्रशासक मिलिंद टांकसाळे व सचिव अरविंद जगताप  यांनी केले आहे. 
हरभरा उत्पादक शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघ, तिन हत्ती चौक, बारामती येथे करावे. शेतकरी नोंदणी करीताना सर्व शेतकरी ऑनलाईन पद्धतीने करावयाची असल्याने नोंदणी करण्यासाठी शेतक-यांचे आधारकार्ड,  ७/१२ उतारा, ऑनलाईन पिक पेरा, बँकेचे पासबुक IFSC कोड सह झेरॉक्स, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे शेतक-यांनी सादर करणे आवश्यक आहेत. तरी हरभरा उत्पादक शेतक-यांनी वेळेत ऑनलाईन नोंदणी करावी. बारामती मार्केट कमिटी मध्ये हरभरा खरेदी सुरू झाले नंतर  शेतक-यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणताना शासनाचे निकषा प्रमाणे स्वच्छ व वाळवुन आणावा अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. 
तरी सर्व हरभरा उत्पादक शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समिती बारामती तर्फे करणेत येत आहे. अधिक माहिती साठी सुर्यकांत मोरे मोबा. ९९७०३४०४१२ यांचेशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment