यशवंत ब्रिगेड अ.नगर जिल्हाध्यक्षपदी नानाभाऊ पडळकर, पुणे उपाध्यक्ष संतोष तांबे, बारामती प्रमुखपदी धनंजय पडळकर यांच्या नियुक्त्या जाहीर.
बारामती:- यशवंत ब्रिगेड संघटनेच्या अ.नगर जिल्हाध्यक्षपदी नानाभाऊ पडळकर यांची निवड करण्यात आली. नानाभाऊ पडळकर यांचे सामाजिक कार्यात मोठे काम आहे, अ.नगर जिल्ह्यात त्यांची चळवळीतील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे, तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील युवा कार्यकर्ते संतोष तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, बारामती तालुका अध्यक्षपदी धनंजय पडळकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, ते को कोऱ्हाळे बुद्रुक येथील राहणारे आहेत सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. यशवंत ब्रिगेडची स्थापना ३ डिसेंबर २०२१ रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मभूमी वाफगाव येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापुराव सोलनकर यांनी केली.वर्षभरात यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून धनगर समजाच्या मागण्यांसाठी मंत्रालयावर धडक मोर्चाचे, तसेच मेंढपाळांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते, यशवंत ब्रिगेड ची आक्रमक संघटना म्हणून ओळख निर्माण केली आहे तसेच बहुजन समाजातील अनेक लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा संघटनेच्या वतीने करण्यात आला. पुढील काळात यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून व्यावसायिक, आर्थिक, सामाजिक, क्षेत्रात काम करणार आहे ओबीसी समाजातील तसेच अठरापगड जाती मधील लोकांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रही दौरे करून संघटना बांधणी करून, नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष बापुराव सोलानकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment