अवैधपणे बिना परवाना तलवार बाळगणाऱ्या सचिन सातव यांच्या विरोधात गुन्हा दाखल..
इंदापूर:- दिनांक २१/३/२०२३ सायकाळी ९.१५ बाजे सुमारास गुन्हे शोध पथकास इसम नामे सचिन दिलीप सातव रा. बिजवडी ता. इंदापूर याचा वाढदिवसाचा केक तलवारीने कापतानाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. सदरची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना दिली असता त्यांनी पोलीस ठाणेस हजर असलेले गुन्हे शोध पथकातील सपोनि योगेश लंगुटे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने पोलीस नाईक सलमान खान पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, पोलीस कॉस्टेबल विनोद लोखंडे यांना बोलावून कायदेशीर कारवाईच आदेश दिले होते.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सबिन दिलीप सातव वय २८ वर्ष व्यवसाय शेती बिजवडी, ता. इंदापूर जि.पुणे याचे राहते घरी जावून त्याच्याकडे तलवारी बाबत विचारणा केली असता त्याने घराच्या पाठीमागे लपवून ठेवलेली लोंखडी तलवार काढून दिली असून पोलीसानी पंचनामा करून ताब्यात घेतली
असून सचिन सातव यास ही कारवाई कामी ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर अवैधपणे बिना परवाना तलवार बाळगणाऱ्या सचिन सातव यांच्या विरोधात पोलीस कॉस्टेबल नंदू जाधव यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली असून त्यावरून इंदापूर पोलीस ठाणे गुर ३५१/२३ आर्म अॅफ्ट कलम ४ सह २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव व नं ७४ हे करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण श्री अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक श्री आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सपोनि योगेश लगुडे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने पोलीस नाईक सलमान खान पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, पोलीस कॉस्टेबल विनोद लोखंडे यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment