स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई;दोन गावठी पीस्टल व दोन जिवंत काढतुसासह आरोपीस घेतले ताब्यात... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 28, 2023

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई;दोन गावठी पीस्टल व दोन जिवंत काढतुसासह आरोपीस घेतले ताब्यात...

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई;दोन गावठी पीस्टल व दोन जिवंत काढतुसासह आरोपीस घेतले ताब्यात...                                                                          इंदापूर:- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई गंभीर गुन्ह्यामध्ये दोन वर्षापासून पाहिजे असणाऱ्या आरोपीस दोन गावठी पीस्टल व दोन जिवंत काढतुसासह ताब्यात घेतले, पाहिजे असलेला फरारी आरोपी पकडणे कामी मा. अंकित गोयल ,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे  अन्वेषण शाखेला आदेश दिला होता. सदर आदेशाचे अनुसंगाने मा.वरिष्ठ पो.नि. श्री अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रा. यांचे मार्गदर्शनाखाली योग्य त्या सूचना देऊन एलसीबी चे पथक तयार करण्यात आले होते.दि  24/3/ 23 रोजी  17/00 वा.चे सुमारास इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 668/2020 भा द वि कलम 307,326,323,504,506,143,148 म पो का कलम 135 मधील पाहिजे असलेला आरोपी नामे सुमित उर्फ बंटी सुधीर सोनवणे वय 32 वर्ष राहणार आंबेडकर नगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे. हा इंदापूर गावचे हद्दीत गलांडवाडी नंबर दोन उमेश उर्फ गोटे क्षीरसागर यांच्या फार्म हाऊस वर असल्याची गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन खात्री करून त्यास ताब्यात घेतले असता त्याचे कब्जामध्ये देशी बनावटीचे दोन अग्निशस्त्र त्यासोबत लागणारे दोन जिवंत काडतुसे मिळून आलेने. त्याचे विरोधात इंदापूर पोलीस स्टेशन गु.र नंबर 357/2023 आर्म ॲक्ट कलम 3 (25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर आरोपीची  वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी इंदापूर पोस्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.सदर कामगिरी,मा.अंकित गोयल ,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.,मा.आनंद भोईटे अपर पोलीस अधीक्षक, पुणे ,मा. गणेश इंगळे उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मा.पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर ,पोलीस उप निरीक्षक अमित सिदपाटील,सहा.फौज बाळासाहेब कारंडे,सहा.फौज रविराज कोकरे,पो. हवा अभिजीत एकशिंगे,पो.हवा.स्वप्निल अहीवळे,पो.हवा.गुरू जाधव,पो.हवा राजू मोमीन,पो.कॉ धीरज जाधव,चालक सहा फौज.काशिनाथ राजापूरे,मुकुंद कदम यांनी केली आहे

No comments:

Post a Comment