*लग्नात होणाऱ्या जास्तीच्या खर्चातून समाजकल्याण*
बारामती दिनांक २४ मार्च (प्रतिनिधी) :- शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतात पण शिक्षक आणि आज समाजात समाज सुधारक म्हणून हा ज्ञानाचा प्रकाश दिवा प्रज्वल केला असे बारामतीतील प्राचार्य अंकुश खोत सर यांनी आपल्या मुलीच्या लग्नात होणाऱ्या जास्तीच्या खर्चातून समाजकार्यासाठी पुढाकार घेत ही मदत गरिबांपर्यंत पोहोचावी म्हणून आभाळमाया ग्रुपच्या अध्यक्षा सौ. अल्पा नितीन भंडारी यांच्याकडे ती रक्कम गरजू आणि गरीब लोकांपर्यंत मदत म्हणून पोहोचावी याकरता देण्यात आली तरी खोत सरांनी अशी मदत करत समाजामध्ये नवीन संदेश देण्याचा प्रयत्न केला की लग्नात होणाऱ्या जास्तीच्या खर्चातून आपण कोणाच्यातरी आयुष्यात आनंद आणू शकतो म्हणून त्यांनी आभाळमाया ग्रुप सोबत या संकल्पनेला उजाळा देत समाजकल्याण साठी मोठा हातभार लावला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून, बारामती नगरीचे जेष्ठ नगर सेवक मा.किरण दादा गुजर, अशोक प्रभुणे, निलीमा गुजर, डॉ आर एम शहा, डॉ.अरूण अडसूळ, डॉ.भरत शिंदे, मा.विश्वासराव नाना देवकाते, मा.प्रशांत काटे, मा.संभाजी नाना होळकर आदी उपस्तीत होते.
अश्या सामाजिक कार्यामध्ये फुल ना फुलाची पाकळी देऊन समाज कल्याण मध्ये सहभागी होण्याचा संदेश देत ही मदत नक्की गरजवंतांपर्यंत पोहचेल, असे अश्वासन देत आभाळमाया ग्रुपच्या अध्यक्षा सौ अल्पा नितीन भंडारी तसेच सदस्य अर्चना भंडारी, शीतल गुंदेचा,अंजलि देसाई यांनी उपस्थिति लावली. ही मदत यांनी स्वीकारत खोत सरांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment