बापरे..अडीच लाखाच्या लाच प्रकरणी बारामतीतील लघु पाटबंधारे विभागाचा इंजिनियर 'गोत्यात'तर शिक्षक लाचेची रक्कम घेताना ताब्यात..! बारामती:- लाच खोरीचे प्रमाणात वाढ होत असतानाच कारवाई देखील तेवढ्याच प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे नुकताच बारामती मध्ये अडीच लाखाच्या लाच प्रकरणी बारामतीतील लघु पाटबंधारे विभागाचा इंजिनियर 'गोत्यात'आला असुन रक्कम शिक्षकाने घेतली याबाबत मिळालेली माहिती अशी की, अडीच लाख रूपयाच्या लाच प्रकरणी बारामतीमधील लघु पाटबंधारे विभागातील अधिकारी इंजिनियर संदीप गोंजारी हे गोत्यात आले आहेत. त्यांचा साथीदार रणजीत प्रकाश सूर्यवंशी (वय 40, शिक्षक ) यांनी लाचेची रक्कम बारामतीमधील जळोची रोड येथे स्विकारली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या
भूसंपादन केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदल्याचा
प्रस्ताव प्रांत कार्यालय येथे पाठविल्याचा मोबदला
म्हणून आरोपी संदीप गोंजारी यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती अडीच लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.
ती रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आरोपी रणजीत प्रकाश सुर्यवंशी यांना जळोची रोड येथे ताब्यात घेण्यात आले आहे . त्यामुळे इंजिनियर संदीप गोंजारी हे गोत्यात
आले आहेत.पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम शिंदे,
विरनाथ माने , कर्मचारी प्रविण तावरे, सौरभ महाशब्दे,चालक पोलिस अभिजीत राऊत यांच्या पथकाने ही सापळा कारवाई यशस्वी केली आहे.
No comments:
Post a Comment