*चंदूकाका सराफ अँड सन्स .प्रा .ली .च्या विवाहाची रेशीमगाठ च्या फ्रेम चे अनावरण .
*उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे व डॉ.सुजित वाघमोडे यांच्या हस्ते 'वेडिंग मोमेंट्स- यू अँड आय ' फ्रेम चे उदघाटन संपन्न*
*बारामती: - आता सध्या विवाह सोहळ्याचे व गुडीपाडवा ,तसेच अनेक फेस्टिव सीझन चालू आहेत .त्यामुळे सध्या चालू असलेल्या लग्नसराई च्या काळात सर्व नागरिकांना काही स्पेशल ,इतरांपेक्षा वेगळे दागिने हवेसे असतात त्यासाठीच चंदकाका सराफ अँड सन्स तर्फे 'वेडिंग मोमेंट्स ,यू अँड आय ' चे कॅम्पेन सुरु केले आहे.उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे व डॉ.सुजित वाघमोडे यांच्या हस्ते 'वेडिंग मोमेंट्स- यू अँड आय ' चे उदघाटन संपन्न झाले .मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उपस्थितांचे सन्मान व स्वागत किशोरकुमार सराफ यांनी केले .यावेळी बोलताना ,विवाह प्रसंगी खास ठरणारे हिऱ्यांचे नावपूर्ण अलंकार हे या वेडींग मोमेंट्स चे खास आकर्षण ठरेल,असे कल्याणी वाघमोडे यांनी मत व्यक्त केले .सुवर्ण उद्योगाबरोबरच सामाजिक जाणीव जपणाऱ्या चंदकाका सराफ अँड सन्स प्रा .ली .बारामती येथिल चेअरमन मा.किशोरकुमार शहा (सराफ ) व मा.नेहाभाभी शहा यांच्या नावीण्यपूर्ण योजनांचे कौतुक करत या उपक्रमाला आपल्या मनोगत मधून वाघमोडे दाम्पत्याने शुभेच्छा दिल्या .लग्नसमारंभात या उत्कृष्ट कारागीरीमुळे वधूच्या सौंदर्यात आणखी चार चांद लागणार आहेत .या विवाहसराई निमित्ताने चंदुकाका सराफ यांनी दि.१७ ते २२ मार्च या कालावधीत 'सोने खरेदीवर सोने मोफत ' ही ऑफरही दिलेली आहे.त्यामुळे घरातील खास लग्नकार्यासाठी आणि गुडीपाडवा निमित्त खास दागिने खरेदी साठी चंदुकाका सराफ अँड सन्सच्या शोरूम ला आवर्जून भेट द्या असे आवाहन या सोहळ्यानिमित्ताने करण्यात आले .
आभार चेअरमन मा.किशोरकुमार शहा यांनी मानले .सूत्रसंचालन धनंजय माने यांनी केले .यावेळी अनेक मान्यवर व ग्राहक उपस्थित होते .
No comments:
Post a Comment