खळबळजनक..जुगार क्लब सुरु ठेवण्यासाठी लाच घेताना तीन पोलीस अँन्टी करप्शनने पकडले रंगेहाथ.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 24, 2023

खळबळजनक..जुगार क्लब सुरु ठेवण्यासाठी लाच घेताना तीन पोलीस अँन्टी करप्शनने पकडले रंगेहाथ..

खळबळजनक..जुगार क्लब सुरु ठेवण्यासाठी लाच घेताना तीन पोलीस अँन्टी करप्शनने पकडले रंगेहाथ..
 जळगाव : - लाच लुचपत विभागाचा कारवाईचा धडाका चालू असल्याचे सद्या पाहायला मिळत आहे कुणी दारू धंदा चालू करण्यासाठी तर कुणी मटका चालू राहण्यासाठी पोलीसांना हप्ता देत असल्याचं कळत असतानाच जुगार कल्ब सुरु ठेवण्यासाठी चार हजार रुपये लाच घेणाऱ्या
यावल तालुक्यातील फैजपूर येथील तीन पोलिसांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. 24) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली. जळगाव एसीबीच्या
पथकाने केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.हेमंत वसंत सांगळे (वय
52, रा. भारत एंटरप्रायजेस मागे, फैजपूर), किरण अनिल चाटे (वय 44, रा. विद्या नगर, फैजपूर) आणि महेश ईश्वर वंजारी (वय 38 रा. लक्ष्मी नगर, फैजपूर )अशी या लाचखोर पोलिसांची नावे आहेत. ही कारवाई जळगाव विभागाचे पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव ,
सहायक फौजदार सुरेश पाटील , पोलीस अंमलदार अशोक अहिरे, सुनिल पाटील, रवींद्र घुगे,शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळु मराठे, प्रदीप पोळ, सचिन चाटे,अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment