शिवजयंती उत्सवात आवाजावर नियंत्रण ठेवा..बारामती पोलिसांचे आवाहन..
बारामती:- बारामती मध्ये भव्य शिवजयंती उत्सव साजरा होत आहे बारामती शहरातील शिवजयंती पाहण्यासाठी आसपासच्या शहरातील ,खेड्यातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणावर येत असतात .हा सोहळा सुद्धा दिमाखदार असतो.
बारामती नगरी याही वेळेस शिवजयंतीसाठी सजलेली आहे रोमहर्षक असे सजावट व स्टेज केलेले आहेत.
असा हा शिवजयंती उत्सव साजरा होत असताना आपण सर्वांनी ही भान ठेवावे की आजूबाजूला हॉस्पिटल आहेत तसेच विद्यार्थ्यांच्या दहावी बारावी स्पर्धा परीक्षा चा अभ्यास सुरू आहे यामुळे आपल्या उत्साहाला द्विगुणित होईल एवढाच धोनीक्षेपणाचा आवाज ठेवावा. कुणीही कर्णकर्कश अशा आवाजात ध्वनीक्षेपक लावू नका. सर्व मंडळांना, स्टेज धारकांना ध्वनी प्रदूषण आवाज कायद्याच्या लिमिटमध्ये ठेवा याबाबत नोटिसा देण्यात आलेले आहेत. तरी सर्वांनी त्याचे पालन करावे .लोकांच्या उत्साहामध्ये कोणतीही बाधा पोलीस दलातर्फे आणण्यात येणार नाही परंतु ध्वनी प्रदूषण होणार नाही याची सर्व मंडळांनी काळजी घ्यावी.
डीजे, प्लाजमा, टू बेस टू टॉप ह्या व्याख्या पोलिसांच्या कायद्यामध्ये नाहीत पोलिसांच्या कायद्यामध्ये साऊंड ची लेवल किती डेसिबल आहे हा महत्त्वाचा भाग आहे ती मोजण्यासाठी पोलिसांनी डेसिबल मोजण्याचे पथक तयार केलेले आहे. कर्ण कर्कश आवाज सोडणाऱ्या मंडळाचा त्या ठिकाणी डिसिबल मीटरने रीडिंग घेण्यात येणार आहे आणि मिरवणूक संपल्यानंतर संबंधित डीजे किंवा संबंधित मशीन किंवा संबंधित ध्वनीक्षेपक हा ताब्यात घेऊन माननीय न्यायालयात खटला ध्वनी प्रदूषण कायद्याप्रमाणे दाखल करण्यात येणार आहे सदरच्या खटल्यामध्ये जर शिक्षा झाली तर किमान एक लाख रुपये दंड संबंधित ध्वनीक्षेपक मालकाला होऊ शकतो तरी सर्वांनी आपला उत्साह कमी होणार नाही परंतु समाजातील इतर विद्यार्थी रुग्ण यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असे आवाहन बारामती शहर पोलीस तर्फे मी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आपणास आवाहन करतो . मिरवणुकीमध्ये कोणत्याही गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या इसमासोबत आपण भांडणांमध्ये भाग घेतला किंवा दारू पिऊन हुज्जत घातली तर गंभीर स्वरूपाचा गुन्हाही दाखल करण्या येईल त्यामुळे गुन्हेगारी रेकॉर्ड असणाऱ्या लोकांपासून चार हात लांब राहा.उद्या माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या नेतृत्वाखाली दीडशे पोलिसांचा बंदोबस्त मिरवणुकीसाठी लावण्यात आलेला आहे एस आर पी एफ प्लाटून व दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेले आहेत.
No comments:
Post a Comment