बारामती शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट..!कधी होणार बंदोबस्त? बारामती(संतोष जाधव):-बारामती शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून हे कुत्रे रात्रभर भुंकत असतात.विशेषतः टी सी कॉलेज रोड वर व आजूबाजूच्या परिसरात हमखास मोकाट कुत्रे पाहायला मिळतात, कामावरून रात्री उशिरा येणारी व्यक्ती एकटी येऊ शकत नाही.तर भर रस्त्यात ही कुत्री बसलेली असतात, रस्त्याने ये जा करणारे टू व्हीलर वाहनांना या अचानक पळत येण्याऱ्या मोकाट कुत्र्यामुळे अपघात होत असतात तर यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहे,तरी या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त व्हावा.अशी मागणी जोर धरत असून तात्काळ यांचा बंदोबस्त करण्यात यावा लहान मुलांना ही कुत्री चावतात त्यामुळे धोका निर्माण झाला असल्याचे दिसतंय,तरी याबाबत बारामती नगरपरिषद विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन यावर तोडगा काढला पाहिजे अशी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
Post Top Ad
Wednesday, March 15, 2023
बारामती शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट..!कधी होणार बंदोबस्त?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment