इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी, चोरीस गेलेले आठ लाख पंच्चाहत्तर हजार रुपयेचे सोन्याचे दागिने ४ तासात हस्तगत करुन चोरीचा गुन्हा उघडकीस.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 6, 2023

इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी, चोरीस गेलेले आठ लाख पंच्चाहत्तर हजार रुपयेचे सोन्याचे दागिने ४ तासात हस्तगत करुन चोरीचा गुन्हा उघडकीस..

इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी, चोरीस गेलेले आठ लाख पंच्चाहत्तर हजार रुपयेचे सोन्याचे दागिने ४ तासात हस्तगत करुन चोरीचा गुन्हा उघडकीस..
                                                                 इंदापूर:- दिनांक ०४/०३/२०२३ रोजी इंदापुर पोलीस ठाणे येथे गुर नं २९८ / २०२३
भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे यातील फिर्यादी नामे अशोक अंकुश व्यवहारे
वय ४३ वर्षे रा. क्षिरसागरवस्ती माळवाडी नंबर १ ता. इंदापुर जि. पुणे यांनी गुन्हा दाखल
केला होता की त्यांचे घरातील साडे सतरा तोळे सोन्याचे दागिणे कोणीतरी चोरून नेले
आहेत अशी फिर्याद दिली होती.
सदर घटनेचे गांभिर्य ओळखून इंदापुर पोलीस स्टेशचे प्रभारी अधिकारी पोलीस
निरीक्षक दिलीप पवार यांनी इंदापुर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाला बोलावुन
सदर गुन्हयाचा तपास करण्याबाबत मार्गदर्शन करून गुन्हा उघकिस आणण्याबाबत सुचना
दिल्या त्यानुसार गुन्हे शोध पथकाने प्रभारी अधिकारी याचे सुचने प्रमाणे वेगवेगळया
कुल्प्त्या वापरून व तांत्रीक विश्लेषन करून सखोल तपास करून सदर गुन्हयात दोन
आरोपी आरोपी नामे ०१) सागर अरून राउत वय २० वर्षे रा. टेंभुर्णी कोष्टी गल्ली ता.
इंदापुर जि. पुणे ०२) दादा बळी शेंडगे वय २१ वर्षे रा. साठेनगर ता. इंदापुर जि. पुणे यांचे
कडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आणी त्यांचे
कडुन सदर गुन्हयातील गेलेले ८७५००० रुपये किंमतीचे साडे सतरा तोळे सोन्याचे
दागिणे हस्तगत करुन चोरीचा गुन्हा ४ तासात उघडकीस आणला आहे. आरोपींना सदर
गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी रिमांड दिले
आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शोध पथक प्रमुख सहा पोलिस निरीक्षक प्रकाश
सोमनाथ पवार हे करित आहेत.
सदरची कामगिरी मा. मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण श्री अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश
पवार, पोलीस हवालदार प्रकाश माने, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक
सलमान खान पोलीस नाईक लखन साळवे पोलीस अंमलदार नंदु जाधव, विनोद लोखंडे
, लक्ष्मण सुर्यवंशी व महीला पो हवा खंडागळे या पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment