बारामती विभागात बालपचारी मुलांचे समुपदेशन शिबिर संपन्न..
बारामती:- हल्ली बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. कोयता गॅंग पासून ते दरोडेखोरी खूना सारख्या घटनांमध्ये बाल अपचारी मुलांचे प्रमाण वाढत आहे. बाल गुन्हेगारी हा मोठा डोकेदुखीचा विषय सर्वांसमोर उभा आहे. जुवेनाईल जस्टिस ऍक्ट प्रमाणे. मुलांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत हा जागतिक संदर्भ असल्यामुळे या मुलांच्यावर कायद्याने कठोर कारवाई करता येत नाही. आणि प्रोफेशनल गॅंग अशा मुलांचा वापर करत आहेत.अशा मुलांना गुन्हेगारी जगतापासून विभक्त ठेवण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे त्यांना योग्य प्रकारे मदत पोहोचवणे यासारखे शिबिर आयोजित करणे काळाची गरज झालेली आहे. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दल व होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन या अशासकीय संस्थेतर्फे शासकीय बाल सुधारग्रह बारामती या ठिकाणी बारामती उपविभागातील बालपचारी मुलांचा समुपदेशन शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये बारामती शहर बारामती तालुका मालेगाव वडगाव निंबाळकर इंदापूर वालचंद नगर भिगवण या पोलीस ठाण्यात पाठीमागील पाच वर्षात ज्या मुलांकडून अपराध घडलेले आहेत त्या मुलांना बोलून त्यांचं सामुपदेशन करण्यात आले. या शिबिरामध्ये 50 मुलांनी सहभाग नोंदवला. या शिबिरात होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन संस्थेचे पदाधिकारी शकील शेख वसीम शेख विशाल वाघमारे सचिन करंजुले अजय वाघ शामल चव्हाण या समुपदेशन करणाऱ्या तज्ञांनी मार्गदर्शन केले या शिबिर कालावधीमध्ये बालसुधारगृहाच्या अधीक्षिका जगताप मॅडम ह्या सुद्धा हजर होत्या बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे साध्या गणवेशात या शिबिरास उपस्थित होते. गौतम बुद्धाने सांगितल्याप्रमाणे तोडणे सोपे असते जोडणे अवघड असते झाडाचे पान तोडणे खूप सोपे असते परंतु ते पान आज तगायत कुणीही झाडाला परत जोडू शकला नाही. म्हणून कोणतीही वस्तू सहज तोडू नका अपराध करू नका. हा संदेश दिला वाल्या कोळ्यासारखा गुन्हेगारी क्षेत्रात धबधबा असणारा थोडक्यात काळीज नसणारा मनुष्य सुद्धा त्याचे विचार बदलले त्याला चांगले मार्गदर्शन भेटले तर वाल्मीक ऋषी होऊन रामायण लिहून अजरामर होऊ शकतो. याचे दाखले या मुलांना पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिले.एखादा मुलगा शाळेत पेन्सिल चोरत असताना किंवा किरकोळ अपराध करत असताना त्याला जर आई-वडिलांनी समज दिली नाही तर भविष्यामध्ये तो मोठा गुन्हेगार बनू शकतो. आणि मग तो बनलेला गुन्हेगार स्वतःच्या पालकांना व गुरुजनांना सुद्धा माफ करत नाही तो त्याच्यावर व्यवस्थित संस्कार केले नाही म्हणून त्यांनाच दोष देतो त्यामुळे पालकांनी सुद्धा संगोपनाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी असे त्यांनी सांगितले.जगात कितीही मनुष्य शक्तिमान असला तरी सुद्धा त्यांनी त्याच्या शक्तीचा उपयोग वाईट कामासाठी केला तर त्याचा अंत हा ठरलेला आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रावण ज्याला साक्षात शंकराने सर्व शक्ती प्रदान केलेल्या होत्या परंतु त्याचा वापर त्यांनी कुकर्मा साठी केला आणि शेवटी दशानंन असून सुद्धा त्याचा अंत सतवचनी रामाच्या हस्ते झाला हेही त्यांनी नमूद केले.यातील बालपचारी ही मुलं सुद्धा समाजाचा एक भाग आहेत त्यांची बुद्धिमत्ता किंवा कौशल्य हे इतर मुलांपेक्षा जास्त असते परंतु त्यांना व्यवस्थित दिशा दिली नाही तर त्यांच्याकडून अपराध होत असतात त्यामुळे त्यांना समुपदेशन करून मेन प्रवाहात आणणे हे सर्व पोलीस एनजीओ समाज वर्कर यांचे कर्तव्य आहे ते सर्वांनी करावे अशी आवाहन सर्व उपस्थित लोकांनी केले. मुलांना अल्पोपहार चहा पाणी देऊन हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला
सदर शिबिराचे आयोजन माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या आयोजनामध्ये उपयोगी पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक गीते पोलीस अंमलदार दशरथ कोळेकर कल्याण खांडेकर अतुल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले
No comments:
Post a Comment