महिला दिनानिमित्त तांदूळवाडी मध्ये 'आरोग्यवर्धिनी' कार्यक्रम उत्साहात साजरा..!
बारामती:- 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जागृती फाऊंडेशन पुणे आणि रागिनी फाऊंडेशन बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थिनी आणि मातांना पर्यावरण पूरक सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले.
'मुलींना सॅनिटरी नॅपकिन वापरण्याची सवय लागावी, आरोग्य विषयक समस्यांना मुलींनी न घाबरता सामोरे गेले पाहिजे, शालेय वयापासून मुलींमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीची सवय असावी. भविष्यात आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, त्यावरून पूरक सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचे फायदे याविषयी जागृती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा स्वानंदी रथ यांनी उपस्थित महिला व मुलींना याविषयी माहिती दिली. व यावेळी 'we are commeted' अशी शप्पथ मुली आणि महिलांनी घेतली.
८ मार्च जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून मुली व त्यांच्या मातांना एकत्रित करून आरोग्यवर्धिनी कार्यक्रमाच्या माध्यमातून ' आपले आरोग्य व आपली जबाबदारी' या विषयावर रागिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी मार्गदर्शन केले.
जागृती फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू महिला व मुलींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप हा उपक्रम महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आयोजित केला जातो. बारामती येथील रागिनी फाऊंडेशन ने पुढाकार घेत हा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी येथे गेली वर्षभरापासून मुलींसाठी राबवला जात आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे ९००० सॅनिटरी नॅपकिन चे वाटप व मार्गदर्शन केले जात आहे.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थिनींनी या उपक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या. व आरोग्यविषयक बदलत जाणारा दृष्टिकोन याबद्दल आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जाधव यांनी केले, वनिता जाधव यांनी आभार मानले, हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी रागिनी फाऊंडेशनच्या सुजाता लोंढे, साक्षी आंबेकर, पूजा बोराटे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने संपन्न झाला.
No comments:
Post a Comment