खळबळजनक..कोयता गॅंग कमी की काय, बंदुकीच आलं वारं..दरोड्याच्या प्रयत्नात
गोळीबार दोन जखमी..! मोरगाव:- कोयता गॅंग चा कहर कुठे थांबत नाही तोवर बंदुकीची हवा सुरू झाल्याचे दिसत आहे,बारामती तालुक्यातील सुपे येथील
महालक्ष्मीची ज्वेलर्स वर अज्ञात चार
व्यक्तीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. पिस्तूलच्या फ़ैरी झाडत हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये स्थानिक दोन व्यक्ती जखमी झाले आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की,आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुपे बस स्थानक शेजारी असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्सचे शटर आतून बंद करीत चार अज्ञात व्यक्तीने सुपे तालुका बारामती येथील
महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या दरम्यान
अज्ञात चार दरोडेखोरांनी पिस्तूलच्या फैरी झाडल्या आहेत. यामध्ये येथील स्थानिक दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. नागरिकांच्या प्रयत्नामुळे एका व्यक्तीस पकडण्यास यश आले असून इतर तीन व्यक्ती फरार असल्याची माहिती पुढे येत आहे.या अचानक घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment