*महिला दिनानिमित्त प्रशासकीय भवनात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 8, 2023

*महिला दिनानिमित्त प्रशासकीय भवनात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान*

*महिला दिनानिमित्त प्रशासकीय भवनात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान*

बारामती दि. ८ : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रशासकीय भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात निवासी नायब तहसिलदार विलास करे यांनी सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. यावेळी नायब तहसिलदार पी.डी.शिंदे यांच्यासह महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
    महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन श्री. करे म्हणाले, समाजातील अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला या सन्मानजनक वागणुकीच्या हक्कदार आहेत. महिलांना घर आणि कार्यालय संभाळत असताना अनेक प्रकारच्या ताण-तणावांना सामोरे जावे लागते. असे असूनही त्या आपली जबाबदारी कौशल्याने पार पाडत असतात. महिलांनी स्वतःसाठी दररोज किमान अर्धा तास वेळ द्यावा, योगा व व्यायाम करावा.
 श्रीमती शिंदे  म्हणाल्या की, राजकीय आरक्षण तसेच नोकरीमधील आरक्षणामुळे महिलाशक्ती पुढे येत असून समाजात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्यामुळे कुटुंबांची स्थितीही बदलत असून कुटुंबातील मुलांचे शिक्षण, आरोग्य याकडे विशेष लक्ष दिले जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment