पोलीस सुरक्षित नाय व त्यांची घरेही नाहीत सुरक्षित...! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 24, 2023

पोलीस सुरक्षित नाय व त्यांची घरेही नाहीत सुरक्षित...!

पोलीस सुरक्षित नाय व त्यांची घरेही नाहीत सुरक्षित...!
 पुणे :-पोलिसांना काम करताना येत असलेली राजकिय अडचण, आंदोलने,उपोषण,जयंती,जत्रा, बंदोबस्त यासारख्या अनेक गोष्टींना सामोरे जात असताना पोलिसांना शिवीगाळ करणे, मारहाण करण्याचे प्रकार सध्या अनेकदा भर दिवसा रस्त्यावर होताना दिसतात. त्यात आता पोलीस
लाईनमध्ये असलेली त्यांची घरेही सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे.नुकताच विश्रांतवाडी पोलीस लाईन शिरुन एका मुलाने दोन पोलिसांची घरे फोडली.याप्रकरणी गजानन चव्हाण यांनी येरवडा पोलीस ठाण्यात  फिर्याद (गु.रजि. नं. २०१ /२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी
एका २० वर्षाच्या चोरट्यावर गुन्हा दाखल केला
आहे.हा प्रकार विश्रांतवाडी पोलीस लाईन इमारत नं. बी. ५ मध्ये १९ मार्च रोजी पहाटे ३ वाजता घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे त्यांच्या मुळ गावी जालना येथे गेले होते.चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.घरातील २७ हजार रुपयांचे २ तोळ्यांचे सोन्याचे दागिने
चोरुन नेले.तसेच स्वामी राठोड यांचे घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील चांदीचे पैंजण,रोख रक्कम असा १५ हजार ८०० रुपयांचा ऐवज
चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment