आशा सोडलेले मोबाईल पोलिसांकडून संबंधितांना परत..
बारामती:- पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी. पोलीस दल हे सेवा देणारे खाते निर्माण व्हावे म्हणून हरवणारे, चोरी होणारे मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर शोधून ते संबंधितांना परत द्यावे अशा सूचना सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना प्रथम गुन्हे बैठकीपासून दिलेले आहेत आणि त्याचा ते दर बैठकीत आढावा घेत असतात.
गहाळ झालेला चोरी झालेला मोबाईल त्याचे आय एम ई आय क्रमांक हे सायबर सेल ला दिल्यानंतर ते सतत त्याचा शोध घेत असतात त्याचा डाटा प्रत्येक पंधरा दिवसाला परत परत मागून शोध घेत असतात आणि तो मोबाईल ट्रेकिंग मध्ये आल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला कळवला जातो. बारामती शहर पोलिसांनी अशा प्रकारे गहाळ झालेले व लोकांना ते परत मिळणारच नाही अशी समज झालेली व त्यांनी संपूर्ण आशा सोडलेले 14 मोबाईल किंमत अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपये किमतीचे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत काही मोबाईल समक्ष वापरकर्त्याकडून घेतलेले आहेत काही मोबाईल चक्क वापरकर्त्याला गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यानंतर त्यांनी पोस्टाने पाठवून दिलेले आहेत बहुतांश हे मोबाईल व राज्यातील आहेत. आणि सदरचे मोबाईल आज संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद त्यावेळी दिसून आला. पोलीस नेहमी हे दंड वसूल करताना वाहतुकीवर शिस्त लावताना दिसून येतात त्यामुळे ते साहजिकच त्यांचे विरोधक वाटतात परंतु लोक उपयुक्त हरवलेल्या वस्तू चोरी झालेल्या वस्तू त्यांना परत दिल्यानंतर पोलीस त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचा मित्र वाटू लागतो या योजनेतून पोलीस आणि जनता यांचे संबंध वृद्धीत होण्यास निश्चितपणे हातभार लागत आहे
सदरचे मोबाईल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस कर्मचारी दशरथ इंगवले सागर जामदार शाहू राणे शंकर काळे महिला पोलीस कर्मचारी माने गोरड यांनी परत केलेले आहेत. सदरचे मोबाईल पोलीस कर्मचाऱ्यांचे हस्ते परत करण्यात आलेले आहेत.
No comments:
Post a Comment