बारामतीत भावाला कामाला लावायचे आमिष दाखवून असह्यतेचा गैरफायदा घेत केला बळजबरीने बलात्कार;गुन्हा दाखल.! बारामती:-बारामतीत एका महिलेवर घडलेल्या अत्याचाराच्या संबंधित गेल्या 12 दिवसांपूर्वी केलेल्या तक्रारीचे पुढे झालं काय अशी वारंवार विचारणा करणारी पीडित महिला पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवत असल्याचे कळतंय,तर लवकरच महिला आयोग, वरीष्ठ पोलीस अधिकारी,प्रसारमाध्यमे,मुख्यमंत्री,गृहमंत्री,विरोधी पक्ष नेते यांच्याकडे दाद मागणार असल्याचे सांगितले याबाबत मिळालेली माहितीनुसार बारामती एमआयडीसी येथील एका ठिकाणी पीडित महिलेवर बलात्कार झाला
आहे. या बाबतची फिर्याद पीडित महिलेने 18
फेब्रुवारी 2023 रोजी बारामती ग्रामीण पोलीस
स्टेशनला दिली आहे.सदर पीडित महिला ही एकटीच कमवती असल्यामुळे तिच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेत भावाला नोकरी लावतो,असे आश्वासन देऊन या गरीब महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत जबरदस्ती केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.पीडितेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुनील मासाळ (रा. काटेवाडी) याच्या विरोधात तक्रार
नोंदविली आहे. सदर संशयित आरोपी हा पीडितेवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत
असल्याचे पीडित महिला बोलताना सांगते. पीडीत महिला ही सद्या बाहेर गावी रहात असून तिला बारामतीमध्ये येण्यासही धमकी दिली जात असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता, शोध पथकाची स्थापना केली असून संशयित आरोपीचा शोध चालु असून तपास चालू आहे असे सांगितले जातंय,याबाबत पीडित महिलेला जर बारामतीत न्याय मिळत नसेल व राजकीय पुढाऱ्यांनी केलेला हस्तक्षेप अडचण ठरत असेल तर न्याय मागायचा कुणाकडे अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे,आमिषे दाखवून त्याचा गैरफायदा घ्यायचा आणि पुन्हा वाऱ्यावर सोडून द्यायचे असे अनेक घटना घडत असताना झालेल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, आई वडीलांना पोरकी झालेली पीडित महिला आपल्या भावाला कामाला लावण्याचे आमिष दाखविणाऱ्या इसमाकडून वासनेची शिकार होते व याबाबत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीला सामोरे जावे लागत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे असे असताना अजूनही संशयित आरोपी फरार असून अटक झालेला नसून अटकपूर्व जामिनाची तयारी करत असल्याचे कळतंय, जर खरंच गुन्हा झाला असेल तर कारवाई झालीच पाहिजे पण जर यामध्ये तथ्य नसेल तर त्याचा खुलासा होणं गरजेचं आहे तरच समाजमाध्यमातून खऱ्या खोटयाचा पर्दाफाश होईल अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
No comments:
Post a Comment