डॉक्टर तुम्ही सुद्धा.. मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी 18 हजाराची लाच घेताना अँटीकरप्शनच्या जाळ्यात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 27, 2023

डॉक्टर तुम्ही सुद्धा.. मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी 18 हजाराची लाच घेताना अँटीकरप्शनच्या जाळ्यात..

डॉक्टर तुम्ही सुद्धा.. मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी 18 हजाराची लाच घेताना अँटी
करप्शनच्या जाळ्यात..
 रत्नागिरी : -लाच घेणाऱ्यामध्ये आत्ता डॉक्टर सुद्धा अडकत असल्याचे समोर येत आहे, नुकताच मिळालेल्या माहितीनुसार  शस्त्र परवान्यासाठी लागणारे मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी  करून तडजोडीअंती 18 हजार रूपयाची लाच घेणाऱ्या डॉक्टर सुरेश दत्तात्रय कुराडेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. डॉ. सुरेश दत्तात्रय कुराडे (वैद्यकीय अधिकारी,उप जिल्हा रूग्णालय, दापोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या वडिलांच्या शस्त्र परवान्याचे नुतनिकरण करावयाचे होते.
त्यासाठी तक्रारदाराच्या वडिलांची वैद्यकीय
तपासणी होऊन त्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र
मिळणे आवश्यक होते. सदरील वैद्यकीय
प्रमाणपत्र देण्यासाठी डॉ. सुरेश कुराडे यांनी
तक्रारदाराकडे सुरूवातीला 20 हजार
रूपयाच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 18 हजार रूपयाची लाच घेण्याचे ठरले. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने
त्यांनी अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
गुरूवारी (दि. 27 एप्रिल) सरकारी पंचासमक्ष
डॉ. सुरेश दत्तात्रय कुराडे यांनी तक्रारदार
यांच्याकडून 18 हजार रूपयाची लाच घेतली.
त्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल
लोखंडे ,अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक
सुशांत चव्हाण , पोलिस निरीक्षक प्रवीण ताटे, पोलिस हवालदार विशाल नलावडे,पोलिस नाईक दीपक आंबेकर आणि चालक पोलिस नाईक प्रशांत कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment