5 हजार रूपयाची लाच घेताना महिला तलाठी अँटी करप्शनच्या जाळयात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 26, 2023

5 हजार रूपयाची लाच घेताना महिला तलाठी अँटी करप्शनच्या जाळयात..

5 हजार रूपयाची लाच घेताना महिला तलाठी अँटी करप्शनच्या जाळयात..                                                                                            जालना:-सद्या तलाठी,मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात खाजगी कामगार ठेवून अवाच्या सव्वा रक्कम घेऊन कागदोपत्री नोंदणी चालू असल्याचे दिसत आहे, नुकताच 68 गुंठे जमीन वारसा हक्क वाटणी पत्रकाप्रमाणे नावावर करून देण्यासाठी 10 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून त्यापैकी 5 हजार रूपये दीड महिन्यांपुर्वी घेवून उर्वरित 5 हजार रूपयाची लाच घेताना महिला तलाठयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सविता प्रदीप पाटील( 30, तलाठी, सजा - शेकटा, अतिरिक्त कार्यभार सजा - करंजगाव, जि. औरंगाबाद)असे लाच घेणाऱ्या महिला तलाठयाचे नाव आहे, याबाबत अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांचे आई व वडिलांच्या नावे करंजगाव शिवारात साडेदहा एकर जमीन आहे. त्या जमिनीपैकी 68 गुंठे जमीन वारसा हक्क वाटणी पत्रकाप्रमाणे तक्रारदार यांच्या नावावर करावयाची होती. त्यासाठी महिला तलाठी सविता प्रदीप पाटील यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रूपयाची
लाच मागितली. दीड महिन्यांपुर्वी तक्रारदार यांनी
त्यांना 5 हजार रूपये दिले. उर्वरित लाच रक्कम 5000 साठी पुन्हा मागणी करण्यात आली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन विभागाकडे तक्रार
दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
सरकारी पंचासमक्ष महिला तलाठी सविता प्रदीप
पाटील यांनी तक्रारदाराकडून 5 हजार रूपयाची
लाच घेतली. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात
आले.छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस
अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलिस
अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सुदाम पाचोरकर,
पोलिस हवालदार गजानन घायवट, पोलिस
अंमलदार गणेश बुजाडे, कृष्णा देठे, गणेश चेके,
चालक पोलिस नाईक प्रविण खंदारे यांच्या
पथकाने ही कारवाई केली आहे.मागदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सुदाम पाचोरकर ,
पोलिस हवालदार गजानन घायवट, पोलिस
अंमलदार गणेश बुजाडे, कृष्णा देठे, गणेश चेके,
चालक पोलिस नाईक प्रविण खंदारे यांच्या
पथकाने ही कारवाई केली आहे.भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास सर्व
नागरीकांना आवाहन करण्यात येते की,
त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी /
कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी
इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क करावा.

No comments:

Post a Comment