ब्रेकिंग न्यूज.. विरोधी पक्षनेते अजित पवार सह पक्षातील 7 आमदारही संपर्काबाहेर? चर्चा-अफवांना उधाण..
पुणे:-राजकीय वर्तुळात पुन्हा काही घडामोडी घडतात का की पुन्हा बंड पुकारला जाईल अश्या उलट सुलट चर्चा घडण्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.अजित पवार यांच्यासह पक्षाच्या सात आमदारांसह फोन नॉट रिचेबेल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून त्यामुळे बड्या बड्या नेत्यांसह अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. अजित पवार काल सकाळी पुण्यामध्ये होते. त्यानंतर सात आमदारांसह संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.अजित पवार पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल असल्याचे अनेकांनी ट्विट देखील केले आहे. अजित पवार नॉट रिचेबल असल्याचे काही राजकीय कारण
आहे का, असाही प्रश्न विचारला जात आहे. कोविडमुळे हा नेता महाराष्ट्र बाहेर गेला असावा अशी ही शक्यता व्यक्त होत आहे. पण सोबत सात आमदार कशासाठी असाही प्रश्न याठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे. हे सात आमदार कोण आहेत याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पण पुणे जिल्हा परिसरातील हे आमदार असावेत, अशी शक्यता व्यक्त होत आहे.गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात
अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत, एकनाथ शिंदे आणि समर्थकांचा बंड याची पुनरावृत्ती होत नाही ना,अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्या दौऱ्यावर जात असण्याच्या २४ तास आधीच या घडामोडी घडल्याने त्याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.यापूर्वी हा नेता याआधी पण असाच नॉट रिचेबल झाला होता. त्यामुळे लोकांच्यात चर्चेला व अफवांना उधाण आले आहे.
No comments:
Post a Comment