खर्चासाठी पैसे न दिल्याने बायकोने नवऱ्याच्या पोटात खुपसला चाकू...
पुणे :- रागाच्या भरात काय घडेल सांगतां येत नाही याचाच प्रत्यय आला नुकताच रमजान महिना सुरु झाल्याने त्याच्या खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रागात बायकोने नवऱ्याच्या पोटात,छातीवर वार करुन त्याला जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत उस्मान अमीर खान (वय ७१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा यांनी कोंढवा पोलीस
ठाण्यात फिर्याद (गु. रजि. न. ३३७ / २३) दिली आहे.त्यानुसार त्यांची सून नाझमीन इम्रान खान (वय ४३)यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत इम्रान खान हा जखमी झाला आहे,याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी यांची सून नाझमीन हिने तिचा पती इम्रान यास रमजान ईद सणानिमित्त
खर्चाकरीता पैसे मागितले. त्याने नकार दिल्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली.त्या दरम्यान नाझमीन हिने रागाचे भरात तिच्या हातातील चाकूने इम्रान याच्या छाती व पोटावर
वार करुन गंभीर दुखापत केली. पोलीस
उपनिरीक्षक वगरे तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment