'अजित पवारांना मुख्यमंत्री करु',कुणी दिली अजित पवारांना थेट ऑफर.. मुंबई:-नुकताच तापलेले राजकिय वातावरण पाहता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबाबतीत अनेक चर्चा सुरु आहेत. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपात जाणार असल्याचा दावा केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. आता यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर आनंदच आणि आम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर ती त्यांना देऊ, असं म्हणत त्यांनी थेट अजित पवारांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.रामदास आठवले म्हणाले, अजित पवार भाजपात जातील असं वाटत आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत.मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा होणार नाही. कारण तेवढे आमदार नाहीत. पण राजकारणात काहीही होऊ शकते. आमच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद दिले तर फार मोठी गोष्ट आहे. आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्रिपद देऊ अशी ऑफर रामदास आठवलेंनी दिली असल्याने राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Post Top Ad
Thursday, April 13, 2023
'अजित पवारांना मुख्यमंत्री करु',कुणी दिली अजित पवारांना थेट ऑफर..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment