*बारामती शहर पोलीस पोलिसांची अवैध दारू धंद्यावर धडक कारवाई* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 16, 2023

*बारामती शहर पोलीस पोलिसांची अवैध दारू धंद्यावर धडक कारवाई*

*बारामती शहर पोलीस पोलिसांची अवैध दारू धंद्यावर धडक कारवाई* 
बारामती:- मा. जिल्हाधिकारी ( राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे) यांचे कार्यालयाकडील जा. क्र. एफ एल आर / सी एल आर 112019/ कोरडा दिवस, पुणे दि.12/4/2023 अन्वये संपूर्ण पुणे जिल्ह्यात दि. 14/4/2023 रोजी आंबेडकर जयंतीच्या दिवशी मद्य विक्री अनुण्यपती बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पो नि श्री महाडिक यांचे नेतृत्वाखाली पो उपनि निंबाळकर, पो उपनि पाटील तसेच संबंधित बीट अंमलदार यांचे विशेष पथक नेमण्यात आले होते. त्यानुसार बारामती शहर पोलीस स्टेशनचे हद्दीत सत्य साईनगर बांदलवाडी येथील भारत लक्ष्मण जोशी याचे मालकीचे साहिल चायनीज सेंटर तसेच अण्णाभाऊ साठे नगर कसबा येथील संध्या रमेश गेलॉत यांचे राहते घरी ठिकाणी छापा टाकण्यात आला. सदर ठिकाणी देशी विदेशी हातभट्टीची दारू असा एकूण 6,700/-रु चा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच कसब्यातील संध्या बार हा बेकायदेशीर उघडा ठेवला होता एक्साईट च्या मदतीने त्याच्यावरही कार्यवाही करण्यात आली अशाप्रकारे अवैध दारू विक्रीचे ठिकाणी कारवाई करण्यात आलेली असून त्या अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...

No comments:

Post a Comment