मुक प्राणी मात्रांवर दया करणे हाच मानव धर्म आहे - आभाळमाया ग्रुपच्या वतीने वन विभाग पाणवड्यामध्ये स्वच्छ पाणीपुरवठा करून प्राणीमात्रांवर केली दया..
बारामती:- उन्हाळ्यात वन प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते त्या अनुषंगाने आभाळमाया ग्रुपच्या वतीने आणि वन विभाग फॉरेस्ट एरिया बारामती गाडीखेल या दोन्ही वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वन विभागाने पानवटे तयार केले आहेत वन्यप्राणी वन क्षेत्र बाहेर जाऊ नये यासाठी ही व्यवस्था केली आहे वाढत्या उन्हाळ्यामुळे प्राण्यांना पाणी मिळत नसल्यामुळे बऱ्याचदा मुक्या प्राण्यांचा दुर्दैवी मृत्यू देखील होतो आणि अशा कारणांमुळे गावाकडील वस्त्यांकडे त्यांचे फिरणे वाढते या गोष्टीमुळे मुक्या प्राण्यांचा जीवितस धोका निर्माण होऊन त्यांची काळजी घेणे आभाळमाया ग्रुपच्या वतीने व उद्देशाने वन क्षेत्रात टँकरचे स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात आला आहे गाडीखेल वन क्षेत्रात नैसर्गिक पानवटे बनलेले आहेत त्यातच कृत्रिम पानवटे तयार करण्यात आलेले आहे त्यामुळे पाणवड्यामध्ये भर उन्हाळ्यात पाणी उपलब्ध झाले आहे हे पानवटे वन विभाग फॉरेस्ट एरिया गाडीखेल वनप्राण्यांची ताण भागवीत आहे असे बारामती जिल्हा पुणे गाडखेल वनपरिषद अधिकारी यांनी सांगितली या यावेळी उपस्थित बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी कुमारी शुभांगी लोणकर, वनपाल हेमंत मोरे, वनरक्षक अनिल माने तसेच वन मंजूर अंकुश चोरमले हे यावेळी उपस्थित होते या संकल्पनेत आयोजन आभाळमाया ग्रुप प्रमुख अल्पा नितीन भंडारी यांनी सांगितले मुक प्राणीमात्रांवर जीव दया करणे हेच मानवधर्म असल्याचे त्या म्हणाल्या तरी कार्यक्रमासाठी त्यांचे सहकारी उपस्थित सायली मोदी, अंजली देसाई, हेमा ओसवाल, लता ओसवाल, मंजू बोराणा, कल्पना ओसवाल यांनी पुरेपूर परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment