पीडित निर्भयाकडे कौशल्यपूर्ण तपास करून बारामती शहर पोलिसांनी निष्पन्न केला आरोपी...
बारामती:- इंदापूर मध्ये खाजगी रुग्णालयात एक अल्पवयीन मुलगी तपासणीसाठी गेली. तपासामध्ये सदर पीडित मुलीस दिवस गेल्याचे निष्पन्न झाले. खाजगी डॉक्टरनी सदर मुलीला शासकीय रुग्णालयात पाठवले. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे शासकीय डॉक्टरांनी इंदापूर पोलिसांना कळवले. इंदापूर पोलीस सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी उपचार घेत असलेली निर्भया ही त्यांना चौकशीत प्रतिसाद देत नव्हती त्यानंतर सदर निर्भयाकडे तिच्या पालकांकडे इंदापूर पोलिसांनी चौकशी केली असता सदर निर्भयाने सांगितले की ती बारामतीत शिक्षणासाठी असताना तिला एक "संदेश कोळेकर "नावाचा इसम अचानकपणे भेटला व त्याने बळजबरी केली आणि त्यामधून तिला दिवस गेलेले आहेत. व त्यांनी त्या इसमाविरुद्ध तक्रार दिली
त्यानंतर सदरचे प्रकरण बारामती शहरचे आहे असे समजून इंदापूर पोलिसांनी सदरची केस बारामती शहर पोलिसांकडे वर्ग केली. बारामती शहर पोलिसांनी सदर पीडित मुलीला बारामतीतील शासकीय महिला रुग्णालयात आणले. तेथे तिच्यावर उपचार सुरू केले व वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या. सदर मुलगी आरोपीचे नाव सांगण्यास तयार नव्हते पालकही सहकार्य करत नव्हते. त्यानंतर सदर ठिकाणी दररोज महिला कर्मचाऱ्यांची मेडिकल साठी कर्तव्य लावण्यात आले. आणि बारामतीच्या महिला पोलीस कर्मचारी यांनी सदर पीडित महिलेला विश्वासात घेऊन अतिशय कौशल्यपूर्ण आत्मीयतेने संवेदनशील पणे सदर पीडित मुलीकडे चौकशी केली असता तिने तिसऱ्या दिवशी सदर आरोपी इसमाचे नाव मयूर दत्तू मासाळ राहणार पिठेवाडी तालुका इंदापूर असे पोलिसांना सांगितले. आणि हा सगळा प्रकार जाणून-बुजून सदर आरोपीला पालक व सदर निर्भया हे पोलिसांपासून लपवत होते. सदर आरोपी याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. पुढे न्यायालयामध्ये सदर प्रकरणाचा जो निकाल व्हायचा तो होईल. परंतु जोपर्यंत सदर पीडितेकडून आरोपीचे नाव निष्पन्न होत नव्हते तोपर्यंत सदर मुलगी अल्पवयीन असल्याने व तिच्याबरोबर अतिप्रसंग केलेल्या इसमाचे नाव मिळत नसल्याने पोलिसांची पाचावर धारण होती. परंतु बारामती शहर च्या महिला पोलीस कर्मचारी यांनी कौशल्य पूर्णपणे नाव निष्पन्न केले. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याची टीम पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, महिला पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, महिला पोलीस हवालदार माया निगडे, ऋतुजा गवळी, सुप्रिया गोरे, जयश्री खेडकर यांनी केलेला आहे. सदर आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेली आहे.
बारामती शहर पोलिसांकडे एक महिला पोलीस उपनिरीक्षक 12 महिला पोलीस कर्मचारी या सर्वांना महिलांबाबतची प्रकरण संवेदनशील हाताळण्याबाबत दररोज सूचना देण्यात आलेले आहेत त्यांना तसे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे त्यामुळे कोणत्याही महिलेने कोणतेही तक्रार असल्यास आमच्या महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा त्यांना निश्चितपणे मदत केली जाईल. महिला विषयी बरेचशे गुन्हे हे ओळखीच्या इसमांकडून व घरातील लोकांकडून होतात त्यामुळे सहसा याला वाचता होत नाही तरीसुद्धा त्यांचं कोणत्याही प्रकारे नुकसान न होता पोलीस हे प्रकरण संवेदनशील पणे हाताळणार आहेत परंतु याच्यातून दुसरी गंभीर गुन्हा होण्याअगोदर पोलिसांशी संपर्क करावा.
No comments:
Post a Comment