धक्कादायक..४ कोटी रुपये परत घेण्यासाठी घरी गेल्या असताना बंदुकीचा धाक दाखवून केला बलात्कार;शूटिंग करून वारंवार शरीर संबंध..
पुणे :- ४ कोटी रुपये परत घेण्यासाठी घरी
गेल्या असताना बंदुकीचा धाक दाखवून त्याने
बलात्कार केला. त्याचे व्हिडिओ शुटींग करुन वारंवार शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत एका ४८ वर्षाच्या महिलेने कोंढवापोलीस स्टेशनमध्ये फिर्याद (गु. रजि. नं. ४०६/२३) दिली
आहे. त्यानुसार पोलिसांनी जुगनू ऊर्फ शफिक
शेख (वय ४५), मुस्ताक मोमीन (वय ४६), केतन व महाराज अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी व जुगनू शेख याच्यांमध्ये भिशी होती. ही
२०२० मध्ये बंद झाली.त्यानंतर शेख याने फिर्यादी यांना दुसरा व्यवसाय करु असे सांगून फिर्यादी व फिर्यादी यांची मैत्रिण यांचेकडून ५० लाख असे ६ हप्ते मिळून एकूण ४ कोटी रुपये वेळोवेळी घेतले. २०२० -२०२१ मध्य गुंतवणुकीसाठी त्याने हे पैसे घेतले होते.
मात्र, त्यांना काहीही मोबदला न देता त्यांची
आर्थिक फसवणूक केली.फिर्यादी या पैसे मागण्यासाठी शेख याच्या कोंढवा येथील घरी गेल्या होत्या.शेख याने फिर्यादी यांना बेडरुममध्ये बोलावून बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याबरोबर
अनैसर्गिकरित्या शरीरसंबंध ठेवले.इतर आरोपींनी फिर्यादी व शेख यांचे नग्न अवस्थेतील फोटो व शरीरसंबंध करतानाचे व्हिडिओ शुटिंग काढले.
फिर्यादी यांना मारुन टाकण्याची धमकी देऊन
वारंवार शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
शेवटी या त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसांकडे
धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक
शेख तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment