बारामतीत शेरसुहास मित्र मंडळाकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी
बारामती दि.२२: येथील मानव एकता युवक संघटना,शेरसुहास मित्र मंडळ व भारतदादा अहिवळे युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.२१ रोजी मुस्लिम बांधवांसाठी आमराई परिसरातील महात्मा फुले नगर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुस्लिम बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सध्या देशातील सामाजिक वातावरण काही शक्तींकडून दूषित करण्याचा प्रयत्न होत असून यामुळे आपल्या देशाची अखंडता आणि सामाजिक बांधिलकी धोक्यात आली आहे.त्यामुळे आपल्या देशाची अखंडता आणि सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी आपण या इफ्तार पार्टीचे आयोजन केले असल्याचे यावेळी आयोजक ॲड.सुशिल अहिवळे आणि शुभम अहिवळे यांनी सांगितले.
या इफ्तार पार्टीला बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे देखील उपस्थित होते.यावेळी बोलताना ते म्हणाले कि आपल्या समाजा समाजा मधील ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे.आणि त्यासाठी अहिवळे कुटुंबाने घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे.
दरम्यान या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण,माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,माजी नगरसेवक असिफ खान,अमजद बागवान,प्रा.रमेश मोरे,ॲड.अब्दुलकरीम बागवान,प्रा.सलीम बागवान,मुनीर तांबोळी,दाऊद शेख,सिकंदर शेख,जहीर पठाण,शब्बीर शेख,गौतम शिंदे,गजानन गायकवाड,सोमनाथ रणदिवे,सचिन जगताप,बबलू जगताप,कैलास शिंदे,चेतन शिंदे,सुशिल भोसले,आकाश मेमाणे उपस्थित होते.
दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितिन गव्हाळे,हर्षद रणदिवे,दिवेश अहिवळे,गणेश पाठक,विजय मागाडे,रितेश गायकवाड,अमोल रणदिवे,अनिकेत थोरात,सोमनाथ कदम,शेखर अहिवळे,सतिश अहिवळे यांनी परिश्रम घेतले
No comments:
Post a Comment