धक्कादायक.. महिलेला झाडाला नग्न बांधून अत्याचार;डोक्यात दगड घालुन केली हत्या...
छत्रपती संभाजीनगर:-महिला अत्याचारात वाढ होत असताना किती क्रुरतेने हा अत्याचार केला जातो या बाबत नुकताच धक्कादायक घटना घडली, चिकलठाणा परिसरात रविवारी एका महिलेची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार
समोर आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. ही केवळ हत्येची घटना नसून आरोपींनी महिलेवर अत्याचार करून डोक्यात दगड घालत निर्घृणपणे खून केल्याचे पुढे आले आहे.या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.याबाबत प्राथमिक माहिती अशी की, चिखलठाणा विमानतळ परिसरात लघुशंकेहून परत येत असलेल्या विवाहितेस राहुल संजय जाधव ( 19 ), प्रिंतम उर्फ सोनु
महेंद्र नरवडे (24), रवी रमेश गायकवाड (34) यांनी अडवलं. प्रतिकार करताच तिघांनी महिलेस नग्न करून झाडाला बांधले. अत्याचार केल्यानंतर महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.पोलिसांनी याबाबत तत्काळ कारवाई करत आरोपींचा शोध सुरु केला. अवघ्या काही तासांत पोलिसांनी चिकलठाणा येथील ऋषीकेश नगर, बकाल वस्तीत राहणाऱ्या राहुल संजय जाधव, प्रिंतम उर्फ सोनु महेंद्र नरवडे, रवी रमेश गायकवाड या आरोपींना अटक केली. न्यायालयाने तिघांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस
कोठडी सुनावली.
No comments:
Post a Comment