दबंग अधिकारी पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांची पुणे सीआयडीमध्ये बदली..
मुंबई :-नुकताच राज्य गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बढतीवर बदल्या केल्या आहेत.त्यामध्ये पोलिस अधीक्षक, पोलिस उप महानिरीक्षक, विशेष पोलिस महानिरीक्षक
दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस
अधीक्षक मिलींद मोहिते यांची राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजेच सीआयडीमध्ये पुण्यात बदली करण्यात आली आहे.पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांची पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) बदली करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी राजलक्ष्मी सतीश
शिवणकर यांची समादेशक, रा.रा. पोलिस बल,
गट क्र. 7, दौंड (जि. पुणे) येथे बदली करण्यात
आली आहे. दरम्यान, आयपीएस अधिकारी
पंजाबराव उगले यांची अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर येथून ठाणे शहरातील अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) येथे बदली करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment