महिला तलाठयासह दोघांना अँटी करप्शनकडून लाच प्रकरणी अटक...
पुणे:- बहुतांश कार्यालयात महिलांना पुढे करून अधिकारी लाच घेत असतात, महिला असल्याकारणाने कुणी पुढे येत नाही त्यामुळे लाच घेण्याऱ्याचे प्रमाण वाढत जाते अश्या वेळी कारवाई होणं गरजेचं आहे,काही चांगल्या महिलादेखील काम करणाऱ्या असतात, नुकताच पुरंदर तालुक्यातील चांबळी तलाठी
कार्यालयामधील महिला तलाठयासह एका खाजगी व्यक्तीला पुण्याच्या अॅन्टी करप्शन विभागाने अटक केली आहे, 2 हजार रूपयाच्या लाचेचे हे प्रकरण आहे.निलम मानसिंग देशमुख (32, तलाठी,सजा-चांबळी, ता. पुरंदर, जि. पुणे) आणि खाजगी व्यक्ती नारायण दत्तात्रय शेंडकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या आईचे जानेवारी 2023 मध्ये निधन झाले आहे. त्यांचे 7/12 उताऱ्यावरून नाव कमी करण्यासाठी
तक्रारदाराने चांबळीच्या तलाठी कार्यालयात
अर्ज केला होता. त्यासाठी त्यांच्याकडे 2 हजार
रूपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने
त्यांनी पुण्याच्या अँटी करप्शन विभागाकडे
तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केली असता लोकसेवक तलाठी निलम देशमुख यांनी तक्रारदाराने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. देशमुख यांनी त्यांचा मदतनीस नारायण शेंडकर करवी 2 हजार रूपयाची लाच घेतली.
लाच प्रकरणी निलम देशमुख आणि नारायण
शेंडकर यांना अँटी करप्शनच्या पथकाने
ताब्यात घेतले आहे.त्यांच्याविरूध्द पुणे ग्रामीण पोलिस दलातील सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
गुन्हयाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक
ज्योती पाटील करीत
आहेत.गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
गुन्हयाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक
ज्योती पाटील करीत
आहेत.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक
अमोल तांबे , अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment