भाजपच्या पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या बारामती तालुका संयोजक पदी बापूराव फणसे यांची नियुक्ती.
कोऱ्हाळे बुद्रुक ( प्रतिनिधी):-
भारतीय जनता पक्षाच्या पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या बारामती तालुका संयोजक पदी कोऱ्हाळे बुद्रुक येथील बापूराव फणसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे जिल्हा सह संयोजक ऍड सुमंत हनुमंतराव कोकरे यांनी फणसे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शाम खजिनदार, सुनील माने, निलेश साळवे, प्रशांत लव्हे, हनुमंत कोकरे, नंदकुमार खोमणे उपस्थित होते.
बापूराव फणसे हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांच्या निवडीने तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
बापूराव फणसे निवडीनंतर म्हणाले की पदाच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचवणार आहे. पक्षाची ध्येय धोरणे व संघटन मजबूत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment