बापरे..कोयत्याने सपासप वार करुन अल्पवयीन तरुणाचा निर्घृण खून..
पुणे :- पुणे जिल्ह्यासह पुणे शहरात देखील दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाचा त्याच्या मित्रांनी कोयत्याने वार करुन खून केला. हा प्रकार बुधवारी (दि.5)दुपारच्या सुमारास घडला.तन्मय इंगळे (वय-17) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.आरोपींनी तन्मय याच्यावर कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून केला. तसेच डोक्यात दगड घातला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत
घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.आरोपी आणि मयत हे एकमेकांचे मित्र आहेत.बुधवारी दुपारच्या सुमारास हे सर्व मांगडेवाडी परिसरातील एका निर्जन ठिकाणी एकत्र आले.त्या ठिकाणी त्यांच्यात वाद झाले.त्यानंतर इतर अल्पवयीन आरोपींनी तन्मय याच्या डोक्यात गडाने आणि कोयत्याने वार केले.यामध्ये गंभीर जखमी होऊन तन्मयचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत आहे.
No comments:
Post a Comment