दप्तर दिरंगाई कायदा २००६ अन्वये मंडल अधिकारी पाटस यांच्यावर कारवाईचे आदेश...
दौंड:- तालुक्यातील वासुंदे हद्दीत खडी क्रेशर माफी यांनी मोठे थैमान घातले आहे वासुंदे येथील सद्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे कारणं मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याने सजीव सृष्टीला गंभीर धोका निर्माण झाला आहे तसेच अनेक प्रकारे तक्रारी देऊन सुद्धा कोणतीही कारवाई होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्थांच्या संस्थापक अध्यक्ष भालचंद्र सर्जेराव महाडिक यांनी सर्व विषयांचा पाठपुरावा केला आहे त्यामुळे दप्तर दिरंगाई कायदा २००६ अन्वये श्री. सुनिल नारायण गायकवाड, मंडल अधिकारी पाटस यांच्यावर कारवाईचे आदेश तहसिलदार दौंड यांनी दिले आहेत व जो पर्यंत तेथील खडी क्रेशर बंद होणार नाही तो पर्यंत सजीव संरक्षण आणि जागृती संस्थेचा लढा सुरू राहणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment