धक्कादायक.. राष्ट्रवादीला दुसरा झटका देणार निवडणूक आयोग?
नवीदिल्ली:-केंद्रीय निवडणूक आयोगाने
राष्ट्रवादीसह, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला. हा राष्ट्रवादीसाठी धक्का मानला जात आहे. या धक्क्यातून पक्ष सावरत असतानाच आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. राष्ट्रवादीला दिल्लीत देण्यात आलेला बंगला काढून घेण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारकडून लवकरच राष्ट्रवादी आणि सीपीआयला तशी नोटीस दिली जाऊ शकते. या दोन्ही राजकीय पक्षांना देण्यात आलेले सरकारी बंगले काढून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय यांच्यासोबत तृणमूल काँग्रेस पक्षालाही दिल्लीत देण्यात आलेली जमीन परत द्यावी लागू शकते. दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी राष्ट्रवादीकडून भूखंडाची मागणी करण्यात आली होती.
राष्ट्रवादीकडून अनेक भूखंड पाहण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला पसंत न पडल्यामुळे पक्ष कार्यालय बांधण्यात आलेले नव्हते.
No comments:
Post a Comment