महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची कारणे दाखवा नोटीस - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 13, 2023

महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची कारणे दाखवा नोटीस

महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची कारणे दाखवा नोटीस ..
मुंबई:- वसई विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटल मध्ये वातानुकुलीत यंत्रामुळे अतिदक्षता विभागाला दि. २३/४/२०२१ रोजी आग लागून १९ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
याबाबत तुषार झेंडेपाटील यांनी २३/४/२०२१ रोजी आयोगाकडे तक्रार दाखल केली, त्याबाबत आयोगाने २९/०४/२०२१ रोजी प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय यांना चौकशी करून कार्यवाही अहवाल ६ सहा आठवडयात सादर करण्याचे आदेश दिले.
         २७/१२/२०२१ रोजी सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी कळविले सदर घटना आमच्या हद्दीत घडली नाही तर वसई-विरार महानगर पालिकेच्या हद्दीत घडली असून सदर प्रकरण त्यांचेकडे हस्तांतर केले आहे. 
         १३/०६/२०२२ रोजी आयोगाने प्रधान सचिव नगरविकास विभाग, मंत्रालय यांना याबाबत चौकशी करून कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
         सदरचे प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दि. ११/०१/२०२३ रोजी मुंबई येथे सुनावणीसाठी ठेवले यावेळी नगर विकास विभागाचे सचिव निकिता पांडे व वसई विरार महापालिका आयुक्त उपस्थित होते. व यावेळी आयोगाला अहवाल सादर केला, यामध्ये मृताच्या नातेवाईकांना ५०००००/- पाच लाख व जखमींना ५००००/- पन्नास हजार रुपये भरपाई दिल्याचे कळविले.
        आयोगाने सर्व वस्तुस्थिती व तक्रारदार यांचे म्हणणे विचारात घेता, यामध्ये शासकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून आला, व हद्दीचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकार जबाबदारी टाळू शकत नाही, त्यामुळे सरकारी अधिकारी यांना दोषी धरून त्यांचेवर कायदेशीर कारवाई का करू नये..? रुग्णांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याने मृताच्या नातेवाईकांना अतिरिक्त दोन लाख व जखमींना दहा हजार रुपये आपणाकडून का वासून करण्यात येवू नये अशी कारणे दाखवा नोटीस राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगाने काढली आहे. याचा खुलासा चार आठवड्याच्या आत मुख्य सचिवांनी करायचा आहे.अशी माहिती अॅड.तुषार झेंडेपाटील,अखिल भारतीय ग्राहक पंचायत मो. ९५४५५९४९५९ यांनी दिली.

No comments:

Post a Comment